चोरट्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

जळगाव। शिवनेरी नगरातील किराणा दुकानसह चार ठिकाणी घरफोडी करणार्‍या चोरट्याला रविवारी न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शिवनेरी नगरात शनिवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी हा सराईत गुन्हेगार पोलिसांना संशयितरित्या फिरताना आढळला होता. त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर त्याने चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली होती. त्याला रविवारी न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.