चोरवडला जुगारावर छापा : पाच संशयीत जाळ्यात

रावेर : तालुक्यातील चोरवड येथे असलेल्या जुगार अड्यावर रावेर पोलिसांनी धाड टाकत पाच जणांना ताब्यात घेतले. पाच हजार दोनशे रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. चोरवडजवळ एका शेतात काही जुगारी जुगार खेळत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिसांनी कारवाई केली. अभिषेक तायडे (रा.चोरवड), धनंजय चौधरी (रा.खानापूर), लाला बारेला (रा.खानापूर), संजय घेटे (रा.चोरवड), रंजीत तायडे (रा.चोरवड) यांच्याकडून एकूण पाच हजार 200 रुपये जप्त करण्यात आले. कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.