तब्बल 19 ग्रामसभा गावात घेऊन प्रत्येक व्यक्तीचा लाभला सहभाग
जिल्हा परिषद सदस्य डॉ.हर्षल माने यांचे प्रतिपादन
पारोळा । कुठलेही काम करताना उत्साह महत्वाचा असतो, तेच काम चोरवड गावात जलसंधारणातून गावकर्यांच्या मनसंधारण झाले, असे मत जिल्हा परिषद सदस्य डॉ.हर्षल माने यांनी चोरवड गावाला पाणी फाऊंडेशनचे जलसंधारनाच्या कामात तालुक्यातुन पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याने पारोळा येथील विश्राम गृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. हर्षल माने पुढे म्हणाले की, पाणी फाऊंडेशनचे चोरवड गावाला मिळालेले बक्षीस हे गावाच्या एकीचे बळ असून, पाणी फाऊंडेशन विषयी याअगोदर आम्हाला कल्पना ही नव्हती. मात्र पाण्यासाठी गावातील राजकारण्यासह ग्रामस्थ एकत्र येत राजकारण्यांचे आखाडे बंद ठेवून आम्ही सर्व एकत्र आलो.
महिला वर्गाचा उत्कृष्ट सहभाग असल्याची दिली माहिती
दोन हजार लोकसंख्या असलेल्या चोरवड गावात श्रमदानाचे नियोजन करण्यात आले. 18 नोव्हेंबर ते 22 मे दरम्यान तब्बल 19 ग्रामसभा गावात घेऊन प्रत्येक व्यक्तीचा सहभाग यात लाभला. यात खास करून महिला वर्गाचा उत्कृष्ट सहभाग होता. यात गावात 260 शोषखड्डे, 5 शेततळे, नालाखोलीकरण व रुंदीकरण, 7 हजार रोपांची भव्य रोपवाटिका, तर 320 शेतकर्यांचे माती परीक्षण करण्यात आले.आगपेटी मुक्त शिवार ही योजना राबवून गाव व शिवारातील घन कचरा न जाळता त्याचे खत निर्मितीसाठी प्रयत्न केले. श्रमदानाचे नियोजन केल्याने तीन महिने गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचा यात सहभागी करून घेतले. यासाठी सर्वांचा सहभाग लाभावा म्हणून प्रत्येक घराला कुलूप लावून पुरुष व महिला वर्ग यांनी सहभाग घेतल्याने यश प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. मात्र पाणी फाऊंडेशच्या या उपक्रमात भाग घेऊन चोरवड गाव प्रसिद्धीपासून दुर राहिले, मात्र या यशामुळे राज्यभर गावाचे नाव हे ग्रामस्थानच्या एकीमुळेच झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वय दीपक सैंदाने यांनी सांगितले-की-तालुक्यातून 50 गावांनी सहभाग घेतला होता. यापैकी 30 गावानी उत्कृष्ट काम केले असून चोरवड गावाने नियोजनबद्ध व गट-तट मुक्त काम केल्यामुळे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले असून या विजयामुळे तालुक्यासह जिल्ह्यात नकीच भर पडेल असे ते यावेळी म्हणाले.
शोषखड्ड्यांमुळे वाढली गावातील जळपातळी
पाणी फाऊंडेशन यात सहभाग घेतल्याने गावातील प्रत्येक घरासमोर शोष खड्डे मोहीम राबविण्यात आली. यामुळे सध्यस्थितीत गावातील जळपातली वाढलीअसून बंद पडलेल्या कूपनलिका सुरू झाल्या आहेत. तालुक्यातुन पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने गावकऱयांचा उत्साह वाढला असल्याची डॉ. माने यांनी सांगितले. यावेळी गावात पेढे वाटून ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला. यावेळी डॉ. हर्षल माने, अॅड.भूषण माने, सरपंच श्रुती माने, डॉ.दीपाली माने, संदेश माने, ग्रामसेवक नरेश सूर्यवंशी, वर्षा पाटील, अनिता पाटील, बेबाबाई भिल, भारती पाटील आदी उपस्थित होते.