चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

0
दिघी : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अविनाश बाळू धनवे (वय 22, रा. वडमुखवाडी, चर्‍होली) असे  आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक निशांत काळे दिघी परिसरात गस्त घालत असताना त्यांना आरोपीसंदर्भात माहिती मिळाली. दिघी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अविनाश धनवे दिघी येथील साईपार्क रोड, पवार हॉस्पिटलजवळ उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अविनाश याला ताब्यात घेतले.
दोन गुन्ह्यांची दिली कबुली…
आरोपीकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला खंडणी दरोडा विरोधी पथक कार्यालय येथे आणून कसून चौकशी केली. त्यात त्याने दिघी आणि आळंदी येथे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभान, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, निशांत काळे, उमेश पुलगम, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.