जळगाव : तब्बल एक वर्षांपासून चोरीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी कांचन नगरातून शुक्रवार, 15 जुलै रोजी सायंकाळी अटक केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम उर्फ दादू किशोर पाटील (कांचन नगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 703 /2021 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असून त्यात शुभम उर्फ दादू किशोर पाटील हा वर्षभरापूसन पसार होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना संशयीत आरोपी शहरात आल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले, शुक्रवारी पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, छगन तायडे, योगेश बारी, किशोर पाटील यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी शुभम उर्फ दादू किशोर पाटील याला कांचन नगर भागातून ताब्यात घेतले. अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गणेश सिरसाळे करीत आहेत.