चोरीच्या दुचाकीवरून दारूची अवैध वाहतूक करणारा आरोपी जाळ्यात

0

रावेर- चोरीच्या दुचाकीवरून अवैधरीत्या दारूची वाहतूक करणार्‍या इसमास रावेर पोलिसांनी अटक केली आहे. रुमसिंग पटण्या बारेला (रा.गारखेडा, ता रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. नागझरी चौकातून आरोपी दुचाकीवरून 240 रुपये किंमतीची देशी दारूची वाहतूक करताना आढळला. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक हरीलाल पाटील, भरत मापे, सुरेश मेढे, जाकीर पिंजारी, मंदार पाटील, सचिन गुमळकर करीत आहेत.

पाचोर्‍यातील दुचाकी अखेर जप्त
आरोपी बारेला याच्या ताब्यातील दुचाकी पाचोरा येथील प्रकाश शिवाजी शिंदे यांच्या मालकीची असल्याची बाब समोर आली असून पाचोरा येथील इम्रान काकर यांच्याकडून आरोपीने दुचाकी (एम.एच.19 डी.4296) अवघ्या आठ हजारात खरेदी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी रुमसिंग पटण्या बारेला (रा.गारखेडा, ता.रावेर) यास अधिक तपासासाठी पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.