आठवड्याभरात दुसर्यांदा चोरी करताना नागरीक व पोलिसांची सतर्कता आली कामी
भुसावळ- शहरातील नाहाटा चौफुलीसमोर झेरॉक्स दुकानाचा पत्रा कापून गत आठवड्यात दोनदा चोरी झाली होती तर रविवारी रात्रीदेखील तीन अल्पवयीन चोरट्यांनी आदित्य मोबाईलसह वेलप्रिंट झेरॉक्स, मीन फोटो स्टुडिओ व साई मेन्स पार्लर दुकानाचा पाठीमागील बाजूला पत्रा कापून त्यातील साहित्य लांबवण्याचा प्रयत्न करताना नागरीकांनी अल्पवयीन चोरट्यांना पकडले तर याचवेळी बाजारपेठ पोलिसांचे गस्ती वाहन जात असल्याने त्यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांना बाजारपेठ पोलिसात आणले. तीनही बालके अल्पवयीन असल्याने त्यांच्याकडून शहरातील काही भागातील चोर्या उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
नागरीकांच्या सतर्कतेने चोरटे जाळ्यात
शहरातील नाहाटा चौफुलीसमोरील झेरॉक्स दुकानात गत आठवड्यात व त्यापूर्वीही चोरी झाली होती तर दुकानांचा पत्रा कापून होणार्या चोर्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली होती. 13 ते 16 वयोटातातील या चोरट्यांनी आदित्य मोबाईल दुकानातून चार्जर, ईअरफोन तसेच सात जुने वापरते मोबाईल असा मिळून एकूण 10 हजारांचा मुद्देमाल लांबवला तसेच वेलप्रिंट झेरॉक्स, मीना फोटो स्टुटिओ, साई मेन्स पार्लर दुकानाचा पत्राही फाडून चोरीचा प्रयत्न केला मात्र याचवेळी नागरीकांचे चोरट्यांकडे लक्ष गेल्याने त्यांना नागरीकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरापर्यंत संशयीतांची चौकशी सुरू होती. आदित्य मोबाईलचे महेश नामदेव वानखेडे (संत धामजवळ, भुसावळ) यानी दिलेल्या फिर्यादीवरून तीनही अल्पवयीन बालकांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.