पुणे । उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथून सुमारे 5 लाख किंमतीची तूर डाळ चोरीला गेली होती. ही तूरडाळ हिंजवडी पोलिसांनी रविवारी (दि.26) पुणे-बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री सापळा रचून जप्त केली. यामध्ये पोलिसांनी डाळीसह ट्रक असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक असद दहेलु व क्लीनर वसीम शेख यांना ताब्यात घेतले आहे.परांडा ढोकी येथून डाळीने भरलेला ट्रक लुटण्यात आला होता. याप्रकरणी ढोकी पोलिस तपास करीत होते. दरम्यान, त्यांना चोरीस गेलेला तृक रिकाम्या अवस्थेत आढळून आला असता अधिक तपास केल्यानंतर ही डाळ दुसर्या ट्रकमधून मुंबईतील पटेल नावाच्या एका व्यापार्याकडे वाकडमार्गे जाणार असल्याची माहिती हिंजवडी तपास पथकातील कर्मचारी आशिष बोटके यांना मिळाली. त्यानुसार, हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला. यावेळी हिंजवडी पोलिसांनी 5 लाख 1 हजार 225 किंमतीच्या डाळीच्या 163 गोणी व 20 लाखांचा ट्रक जप्त केला आहे. कारवाईनंतर हिंजवडी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच वाहनचालक आणि क्लिनरला ढोकी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास ढोकी पोलिस करत आहेत.