चोर…चोर… आवाज एैकताच चोरट्यांनी ठोकली धूम

0

आदर्श नगरात प्रयत्न

शेजार्‍यांच्या सतर्कतेने घटना टळली

जळगाव- आदर्शनगरामधील उत्कर्ष सासायटीतील रहिवासी अजय साळुंखे यांच्या कुलूप बंद घरात अज्ञान दोन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली़ मात्र सतर्क असलेले व वेळीच प्रकार लक्षात आल्याने शेजार्‍यांच्यांनी चोर…चोर आरडोओरड केल्याने चोरट्यांनी धुम ठोकली. व चोरीचा घटना टळली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़

अजय साळुंखे हे उत्कर्ष सोसायटीत सुरेश देवराम देशमुख यांच्या घरात भाड्याने राहतात़ दरम्यान, काही काम असल्यामुळे ते दोन ते तीन दिवसांपूर्वी सामनेर येथे गेले होते़ त्यामुळे घरी कुणीही नसल्यामुळे घर कुलूप होते़ हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे सुमारे 3़45 वाजेच्या सुमारास अजय साळुंखे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला़

घरात प्रवेश करताना दिसले दोघे चोरटे
कुलूप तोडल्यानंतर कडी उघडत असताना शेजारी राहणारे संतोष वर्मा यांना कुणीतरी दरवाजा उघडत असल्याचा आवाज आला़ त्यांनी लागलीच घराबाहेर येऊन पाहिले तर त्यांना दोन चोर दरवाजा उघडताना दिसले़ त्यांनी त्वरीत चोऱ़़ चोऱ़़ असा आरडाओरड करण्यास सुरुवात केली. शेजारचे जागी झाले पाहून चोरट्यांनी देखील त्या ठिकाणाहून पळ काढला़

तोंडाला रुमाल बांधलेले चोरटे
चोरट्यांनी फक्त सोबत कुलूपच नेले़ त्यामुळे घरातील कुठलीही वस्तु चोरीला गेली नाही़ हा प्रकार वर्मा यांनी अजय यांनी कळवताच त्यांनी सकाळीच घरी धाव घेत रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले़ त्यानंतर तक्रार दाखल केली़ चोरट्यांनी काळ्या रंगाचे कपडे आणि तोंडाला रूमाल बांधल्याचे वर्मा यांनी सांगितले़