चौघांचा एकावर चाकू हल्ला; तरूण जखमी

0

अमळनेर । चौघांनी धारदार शास्त्राने केलेल्या हल्ल्यात एक युवक जखमी झाल्याची घटना गुरूवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास सेंट्रल बँकेजवल स्टेशन रस्त्यावर घडली. मुंदडा नगर मधील अथर्व बंगलोमध्ये राहणारे निलेश गोकुळ शेले व शैलेश वायकर हे स्टेशन रस्त्यावर गप्पा मारत असतांना अजय प्रल्हाद बिर्‍हाडे, विशाल विजय सोनवणे, सोनू बिर्‍हाडे, पप्पू सोनवणे, यांनी पुढे जाऊन रिक्षा आडवी केली व रिक्षातून तलवारी व इतर शस्त्रे काढून निलेशवर हल्ला चढवला दगडाचाही वापर करण्यात आला.

निलेशच्या डोक्यावर मागील बाजूस जखम झाली तसेच त्याला पोटावर, पाठीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली शैलेश वायकर देखील किरकोळ जखमी झाला शिवशक्ती गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन वेळी गुलाल उधळू दिला नाही म्हणून झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले दरम्यान पोलिसांनी गुन्हयच्या वेळी वापरलेली रिक्षा (क्र. एमएच 19 व्ही 8223) जप्त केली असून चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.