चौघांनी वेगवेगळ्या घटनेत घेतले विष

0
जळगाव – वेगवेगळ्या घटनेत चौघांनी विष घेतल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृतीस्थिर आहे. याबाबत जिल्हा रूग्णालयात माहिती घेतली असता, अनिल चंपालाल ठाकरे (वय-30) रा. डोंगरगाव ता.पाचोरा, आशा सुभाष पाटील (वय-45) फुलगाव ता.धरणगाव, सपना पवन कोळी (वय-19) रा. जळके ता.जळगाव आणि नाना महादू सुतार (वय-47) कढोली ता.जळगाव यांचा समावेश आहे. चौघांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.