पुणे । पुणे महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका स्वाती लोखंडे यांच्या पुतण्यावर घातक शस्त्राने वार करणार्या चौघांना गुन्हे शाखा एकच्या पथकाने कामगार पुतळा झोपडपट्टीजवळील नदीपात्रातून जेरबंद केले. यावेळी त्यांच्या ताब्यातून एक पिस्तुल आणि तीन कोयते जप्त केले. राज बापु ढावरे (वय 27), सूरज उर्फ छोट्या ज्ञानेश्वर पवार (वय 23), सागर विलास देवकुळे (वय 23) आणि दत्तात्रय उर्फ बंकी मोहन साठे (वय 27) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. चौघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सध्या ते शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार आहेत. लोखंडे कामगारवस्ती पुतळा परिसरातील समाजकार्यात पुढाकार घेत असल्यामुळे त्यांचा पुतण्या हिरामण विश्वानाथ लोखंडे (वय 24) याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.