जळगाव। जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यातील 40 भाविकांच्या गटाला चौधरी यात्रा कंपनीच्या टुर मॅनेजरच्या निष्काळजी पणामुळे विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. पुरी शहरा बाहेर बसची वाट पाहत त्यांना दिवसभर ताटकळत बसावे लागले.
कोलकात्याहून काल सायंकाळी हे भाविक जगन्नाथपुरीत पोहचले आज दिवसभर ते जगन्नाथपुरीत भ्रमंती करणार होते. सकाळी ऐनवेळी ठरलेली बस बिघडल्याने दुरुस्तीसाठी घेवून गेलेला टूर मॅनेजर दिवसभर नॉटरिचेबल होता. या भाविकांनी कुटुंबिय व परिचितांकडून या कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर सायंकाळी 6 वाजता त्यांना पर्यायी बस उपलब्ध करुन देण्यात आली. कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी भाविकांच्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त केली व त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था पुन्हा पुरीतच केली जाणार असल्याचे सांगितले.