चौधरी, शर्मा यांच्या चित्रप्रदर्शनाचा शेवटचा दिवस

0

जळगाव: येथील रिंगरोड वरील पी.एन.गाडगीळ ज्वेलर्सच्या कला दालनात चित्रकार खुशबु शर्मा व श्‍वेता चौधरी यांच्या चित्रांचे आर्ट उत्सव’ या नावांने आयोजित चित्रप्रदर्शनास महापौर सिमा भोळे यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो रसिकांनी भेट दिली. या चित्रप्रदर्शनाचा रविवार दि.30 सप्टेंबर रोजी शेवटचा दिवस असून सकाळी 11 ते रात्री 8.30 पर्यंत सर्व कला रसिकांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य व प्रवेश खुला असून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, अशी विनंती आयोजनांनी केली आहे.