जळगाव : शहरात दोन दिवसापूर्वी डंपरने एका तरुणाच्या हाताचा चक्काचूर केल्याचा घटना ताजी असतांना सोमवारी सकाळी चौबे शाळा चौकात एका वृद्धाला डंपरने उडविल्याची घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली असून वृद्धाच्या उजव्या पायाचा पंजा गंभीररित्या जखमी झाला. जखमी अवस्थेत वृद्धास खासगी रिक्षाने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातात वृद्धाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने संतप्त नागरिकांनी डंपरवर दगडफेक केली. यावेळी मोठा जमाव जमला होता.
डंपरसह चालकास पोलीसांनी घेतले ताब्यात
शहरातील रामदास भिवा भील (वय-70) रा. काशीबाई शाळाजवळील मशिदीजवळ, शनिपेठ हे सकाळी 9 वाजेच्या समारास महात्मा गांधी चौकाजवळील चौबे शाळा चौकातून पायी जात होते. काल सकाळी मुलगा नाना कोळी व रामदास भिवा भील यांनी रविवारी गांधी मार्केट जवळील एका फोटा स्टुडिओत पासपोर्ट फोटो काढले होते. ते फोटो घेण्यासाठी आज जात असतांना मागून भरधाव वेगात आलेल्या डंपर क्रमांक (एमएच 19 बीजी 2313)ने त्यांना जोरदार धडक दिली. डंपरने वृद्धास उडविल्याने घटनास्थळी परीसरातील मोठा जमाव झाला. वृद्घांचा उजव्या पायाच्या पंजा गंभीररित्या जखमी झाल्याचे पाहून संतप्त जमावाने डंपर चालक स्वप्निल भिमराव धनगर (वय-23) याला शनिपेठ पोलीसांच्या स्वाधिन केले. संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरवर दगडफेक केली. त्यामुळे डंपरच्या काचा फुटल्या. मात्र पोलीसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे जमावाला शांत केले.
पासपोर्ट फोटो घेण्रासाठी जात होते स्टुडीओत
शासकीर कामांसाठी लागत असलेल्या रंगीत फोटो जखमी रामदास भील व मुलगा रांनी रविवारी स्टुडिओत काढले होते. फोटो घेतल्यानंतर पुन्हा घराकडे परतत असतांना भरधाव डंपर चालकाने नेल्याने जखमी झाले.