नवी दिल्ली :. त्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भुजबळांनी आज भेट दिली.राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना ज्या सदनाच्या गैरव्यवहारप्रकरणी जेलमध्ये जावं लागलं होतं महाराष्ट्र सदन छगन भुजबळांच्या काळात बांधले गेलं होतं. त्यावेळी भुजबळांनी सदनाच्या बांधकामासाठी बिल्डरला अतिरिक्त फायदा मिळवून दिला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली होती .