छत्तीसगडमधील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

0

रायपुर : छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण डोंगरगड येथून भिलाईला परतत होते. राजनंदगाव येथे आल्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाला. एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दरम्यान, मंगळवारी छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भारतीय इस्पात प्राधिकरण लि.च्या भिलाई येथील कारखान्यात स्फोट झाला होता. यामध्येही ९ जण ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले होते.