मावळ, खेड ताल्यक्यात विविध कार्यक्रम : शाळा, ग्रामपंचायत, नगरपरिषद, संस्थांच्या वतीने महाराजांना अभिवादन
मावळ । छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवारी मावळ, खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जय भवानी, जय शिवाजी!, छत्रपती शिवाजी महाराज की जय! या घोषणांनी रीसर दणाणून गेला होता. मिरवणूक, रॅली, स्पर्धा अशा कार्यक्रमांतून महाराजांविषयींचा आदर व्यक्त करण्यात आला. सर्वधर्मिय नागरीक यानिमित्त एकत्र आले होते. समाजात ऐक्य आणि सलोखा जपत महाराजारांना अभिवादन करण्यात आले.
लोणावळ्यात शिवज्योतीची मिरवणूक
तारखेप्रमाणे साजरी केली जाणारी शासकीय शिवजयंती लोणावळ्यातील काही भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गवळीवाडा विभागात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तिकोना किल्ल्यावरून प्रज्वलीत करून आणल्या गेलेल्या शिवज्योतीचे शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत करण्यात आले. याठिकाणी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या शिवज्योतीची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. नगरसेवक निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, संजय घोणे, सुवर्णा अकोलकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, दत्तात्रय गवळी, परशुराम शिर्के, नितीन अगरवाल, अतुल जोशी, जंगबाहदूर बक्षी, राजू गवळी यांच्यासह अनेक मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवजयंतीचे औचित्य साधत लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने तुंगार्ली येथे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
कुरूळी, चिंबळी, केळगांव, मोई, निघोजे परिसरात विविध ठिकाणी जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतीच्या वतिने मोठ्या उत्साहात शिवजंयती साजरी करण्यात आली. केळगावमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी बालशिवजी, मॉसाहेब जिजाऊ, मावळे यांचा पोशाख परिधान शाळेत आले होते. या विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढली होती. शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण परीसर दणाणून गेला होता. सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव सोनवणे यांनी शाळेत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थी बालसभा घेतली. बालसभेचे अध्यक्षस्थान सारिका अवचार हिने भूषविले. विद्यार्थी सिद्धी विरकर हिने अनुमोदन दिले. बालसभेत पृथ्वीराज मसके, साई पिंजण, तन्मय मुंगसे, ॠगवेद मुंगसे, वेदांत जाधव, रोहन सोनवणे, आदित्य निर्मळ, सोमनाथ कसबे, वैष्णवी गायकवाड, सार्थक सपकाळ आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक कुंडलिक सातकर, विजया म्हसे, शरद कुर्हाडे, सपना पवार, रेखा चव्हाण, मुख्याध्यापक सुनिता काशिद, संदिप गुंड आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन तन्वी मुंगसे तर आभार विनोद चव्हाण यांनी मानले.
शिवज्योतीचे पूजन
चिंबळीफाटा येथील श्री समर्थस्कुल व कॉलेजच्या वतीने निघोजे येथे शिवज्योतीचे पूजन करून ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढली होती. कुरुळी येथे सरपंच चंद्रकांत बधाले, उपसंरपच अमित मुर्हे व श्रीसर्मथ स्कुलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, कार्यअध्यक्ष विद्या गवारे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून चिंबळी फाटा येथे शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान, पोवाडा हे कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थी, शिक्षकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. उपसंरपच आशिष मुर्हे, हिरामण येळवंडे, संतोष येळवंडे, चेअरमन अनिल बागडे, शातांराम घाडगे, बाबासाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर गोसावी, नाना जैद आदी मान्यवरांसह सर्व ग्रामस्थ शिक्षकवृंद याप्रसंगी उपस्थित होते. कुरुळी ग्रामपंचायतीच्या वतिने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरपंच चंद्रकांत बधाले, उपसंरपच अमित मुर्हे यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
राजगुरुनगर । श्री शिवराज्याभिषेक उत्सव समितीतर्फे राजगुरुनगरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी महाराजांच्या मिरवणूकबरोबर स्वच्छता अभियानाचा सामाजिक उपक्रमदेखील राबविण्यात आला.
आळंदीत शिवजयंती उत्साहात साजरी
आळंदी नगरपरिषदेत नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेविका सविता गावडे, स्मिता रायकर, नगरसेवक प्रशांत कुर्हाडे, सचिन गिलबिले, सागर बोरुंदीया, प्रकाश कुर्हाडे, दिनेश घुले, आदित्य घुंडरे, रामदास भांगे, दत्तात्रय सोनटक्के, मनोज राठोड आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. व्यापारी संकुल समोरील शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास नगराध्यक्षा उमरगेकर, उपनगराध्यक्ष भोसले, भूमकर, नागरिक, विविध संस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. संस्थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 170 नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रम राबविला.