‘छम्मा छम्मा’ वर थिरकणार एली अवराम

0

मुंबई : १९९८ मध्ये आलेला ‘चायना गेट’ या चित्रपटातील उर्मिला मातोंडकरचे सुपरहिट गाणं ‘छम्मा छम्मा’ प्रचंड गाजले होते. आता या गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन रिमेक मध्ये एली अवराम ठीकरताना दिसणार आहे.

आतापर्यंत बॉलिवूडमधील बऱ्याच जुन्या गाण्यांचे रिक्रिएट व्हर्जन आले आहेत. उर्मिलाचे ‘छम्मा छम्मा’ गाणे सुद्धा याच वाटेवर आहे.
अरशद वारसीच्या ‘फ्रॉड सैया’ या चित्रपटात हे गाणं दाखविले जाणार आहे.