पुणे। जागतिक छायाचित्रदिनाचे औचित्य साधून छायाचित्रण छंद म्हणून जोपासलेल्या अथवा व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी पिक्सलेन्ट या पहिल्या संकेतस्थळाची सुरुवात करण्यात आली. यामुळे छायाचित्रण कलेमध्ये मार्गदर्शन मिळवण्याची संधी सहज शक्य झाली आहे.
डॉ. जोशी यांच्या संकल्पनेतून ळिुश्रशपीं.लेा या संकेतस्थळाची निर्मिती केली असून वारी हॉस्पिटॅलिटीतर्फे जागतिक छायाचित्रणदिनाचे औचित्य साधून सुमंत मुळगांवकर सभागृहात लँडस्केप छायाचित्रणातील तज्ज्ञ ललित देशमुख यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संकेतस्थळावर मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले सुप्रसिद्ध छायाचित्रकार ललित देशमुख, समीर बेलवलकर, रितेश रमैय्या, विनोद बारटक्के, सुशील चिकणे, सागर गोसावी, सतीश पाकणीकर, रॉबिन सैनी आणि विक्रम पोतदार हे उपस्थित होते.
डॉ. जोशी म्हणाले की, वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर फोटोग्राफरने काढलेले पाच फोटो त्याला या (ुुु.ळिुश्रशपीं.लेा) वेबसाईटवर ‘अपलोड’ करता येतील. ‘अपलोड’ करण्यात आलेल्या फोटोच्या अनुषंगाने तज्ज्ञ छायाचित्रकार त्या फोटोमधील त्रुटी, चांगल्या गोष्टी, काय सुधारणा करता येतील आणि इतर गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन फोटोग्राफरला करतील.
‘रिव्ह्यू’ करण्यासाठी फोटो पाठविणार्या फोटोग्राफर्सचे तीन गट करण्यात आले आहेत. ‘बेसिक’, ‘अॅडव्हान्स्ड’ आणि ‘एक्स्पर्ट’ अशा तीन गटानुसार फोटोग्राफर्सची विभागणी करण्यात येईल. त्यांच्या फोटोची चर्चा केली जाईल. छायाचित्र अपलोड करणार्या व्यक्तीसच ते दिसू शकेल. तांत्रिकदृष्ट्या उत्तम फोटोंना ’बेस्टी’ विभागात स्थान मिळेल जे या संकेतस्थळाला भेट देणार्या प्रत्येक व्यक्तीस दिसू शकेल.