छायाचित्रे मनाला भुरळ घालतात

0

नंदुरबार । निसर्ग आणि मानव यांच्या संबंधातील उलगडा दर्शविणारे छायाचित्र या प्रदर्शनात पहावयास मिळाले. निसर्गातील झाडं, फुलं यातून माणसाची स्पंदने जाणवतात. यातून टिपली जाणारी छायाचित्रे मनाला भुरळ घालतात. त्यातून स्वानंद मिळतो, असे प्रतिपादन उपवन संरक्षक पियुषा जगताप यांनी केले. ज्येष्ठ छायाचित्रकार स्व.रामभाऊ जगन पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहर पोलीस ठाणे शेजारील विभारे बिल्डींग येथे रामभाऊ पाटील स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दि.3 दरम्यान राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण श्रीमती जगताप यांच्या हस्ते दि.5 जुलै रोजी करण्यात आले.

निसर्ग या विषयावरील छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधिक्षक रमेश पवार, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अभिजीत मोरे, नेताजी सुभाषबाबू मित्र मंडळाचे अध्यक्ष ईश्‍वर चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विलास रघुवंशी, व्यावसायिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष मानसिंग राजपूत, सुरेश पाटील, अरुण पाटील, भरत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमती जगताप पुढे म्हणाल्या, की राज्यात वृक्ष लागवड सप्ताह सुरु असून त्याचवेळेस निसर्ग या विषयावरील राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन भरविल्यामुळे वृक्ष लागवडीचा या निमित्ताने प्रचार झाला. त्या माध्यमातून रसिकांना निसर्गाच्या विविध रुपांचे दर्शन झाले.

मुंबईसह चंद्रपुरच्या छायाचित्रकारांचा सहभाग
या स्पर्धेत राज्यभरातून मुंबई ते चंद्रपूर पर्यंतचा छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला. रमेश पवार यांनी यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धा व प्रदर्शन भरवून वेगळा उपक्रम राबविल्याचे सांगितले. डॉ.अभिजीत मोरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी छायाचित्रकार सुर्यकांत खैरनार यांना छायाचित्र स्पर्धेत पारितोषीक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.े सुत्रसंचालन नागसेन पेंढारकर, प्रास्ताविक नितीन पाटील यांनी तर आभार कपिल पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत पाटील, अविनाश पाटील, कपिल पाटील, सुनिल कुलकर्णी, सुर्यकांत खैरनार, महेश पाटील, योगेश अहिरे, संदीप राजभोज, तुषार पाटील, जयेश पाटील, रमेश मराठे, विशाल पाटील, गोटू पाटील, निरज कुलकर्णी, पवन राजपूत, पवन कन्हेरे, अमित कापडणे, निलेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनातील विजेते
प्रथम राहुल चिलगीरवार (चंद्रपूर) (दहा हजार रुपये रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) द्वितीय प्रशांत खरोटे (नाशिक) (सात हजार पाचशे रुपये रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) तर रोहित बेलसरे (विभागातून तृतीय-चंद्रपूर), देवानंद साखरकर (विभागातून तृतीय-चंद्रपूर) यांना सामाईक (पाच हजार रुपये रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) उत्तेजनार्थ अनिल माळी (नाशिक), विराज खोरजुवेकर (मुंंबई), नसिर अख्तार (कोल्हापूर) यांना प्रत्येकी (एक हजार रुपये रोख बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) वाटप करण्यात आले. स्पर्धेत मुंबई, ठाणे, बारामती, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, जळगांव, धुळे, नंदुरबार, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर, नागपूरसह 172 छायाचित्र स्पर्धेत प्राप्त झाले आहेत. परिक्षण पद्मश्री सुधारक ओलवे यांनी केले.