जळगाव । स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेतर्फे छाया धनसिंग तायडे यांना जीवनसंग्राम रणरागिणी पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनानिमत्त या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. छाया तायडे यांनी जवीन संघर्षकरून शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. तायडे ह्या मास्टर्स अॅथेलेटीकच्या 50 वर्षपुढील गटातील धावपटू असून त्यांनी आतापर्यंत राज्य पातळीवर 4 गोल्ड मेडल व 2 सिल्हर मेडल प्राप्त केले असून राष्ट्रीय पातळीवर 2019 मध्ये 5 किमी रनिंगमध्ये भारतात 5 वा क्रमांक पटकविला आहे.