Molestation Of Minor Girl in Bhusawal : Two Accused From Phulgaon Arrested भुसावळ : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन शाळकरी मुलीचा छेडखानी करीत विनयभंग केल्याप्रकरणी फुलगावच्या दोघा तरुणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना अटक करण्यात आली.
फुलगावच्या तरुणांना अटक
पीडीता तालुक्यातील एका गावातून शिक्षणासाठी दररोज भुसावळात येते. सोमवारी सकाळी नऊ वाजता फुलगाव बसस्टॉप ते भुसावळ बसस्थानकादरम्यान पीडीतेचा आरोपींनी दुचाकी पाठलाग करून लज्जास्पद वर्तन करीत विनयभंग केला तसेच . या प्रकरणी पीडीतेने सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपी देवेंद्र पंकज पाटील (20) व लोकेश दत्तात्रय महाजन (26, फुलगाव, ता.भुसावळ) यांच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.