छेत्रीच्या 1 गोलमुळे भारताला विजय

0

बेंगळूरु । आशियाई फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत भारताला किर्गिझस्तानवर 1-0 असा गोल नोंदवता आला. या विजयासह भारताने साखळी गटात आघाडी घेतली आहे.सामन्यात सुरवातीपासून भारतीय खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केले.भारतीय खेळाडूंनी किर्गिझस्तानच्या गोलपोस्टजवळ अनेक वेळा मुसंडी मारली.

सर्व प्रयत्न असफल ठरले. किर्गिझस्तानच्या खेळाडूंनी अनेक वेळा भारतीय गोलपोस्टजवळ शिरकाव केला. त्यांचे दोन-तीन हुकमी प्रयत्न भारताचा गोलरक्षक गुरप्रितसिंग संधूने शिताफीने रोखले.छेत्रीच्या गोलने भारताने 1-0 ने हा सामना जिकला. अखेर भारताला 69व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली,जेजेने दिलेल्या पासवर छेत्रीने प्रतिस्पर्धी संघाच्या तीन खेळाडूंना चकवले व चेंडू गोलमध्ये तटवला.