जंक्शन स्थानकावरील नव्या प्लॅटफार्मचा आता एक व दोन क्रमांक

0

रेल्वे प्रशासनाचा निर्णय ; जुना प्लॅटफार्म एक झाला तीन तर तीन झाला चार

भुसावळ- जंक्शन स्थानकावर नुकताच उभारण्यात आलेल्या प्लॅटफार्म क्रमांक नऊ व दहाला आता एक व दोन क्रमांक देण्यात आला असून पूर्वी असलेला जुना प्लॅटफार्म क्रमांक एक आता तीन क्रमांकाने तर तीनला चार क्रमांकाचा प्लॅटफार्म म्हणून ओळखले जाणार आहे शिवाय जुना प्लॅटफार्म क्रमांक दोन हा आता कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

नव्या प्लॅटफार्म आता पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या थांबणार
जंक्शन स्थानकावर नुकतेच उभारण्यात आलेल्या प्लॅटफार्मवर आता पॅसेंजरसह एक्स्प्रेस गाड्या थांबणार आहेत. दरम्यान, जुना प्लॅटफार्म क्रमांक चारची ओळख आता पाच तर जुना प्लॅटफार्म क्रमांक पाचची ओळख पाच अ तसेच प्लॅटफार्म क्रमांक सहा, सात व आठ या क्रमांकाचे प्लॅटफार्म आहे त्याच नावाने ओळखले जातील. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.