जंगल जमीन आपुणोसे ! गर्जनेने आदिवासी दिन साजरा

0

नंदुरबार । जिल्ह्यात आदिवासी दिनानिमित्त बुधवार 9 आगस्ट रोजी भव्य रॅली काढण्यात आल्यात. या रॅलीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून तसेच ढोल ,डफच्या तालावर नृत्य करीत संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात विविध सामाजिक व राजकीय पक्षांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात आदिवासी बांधवांनी पारंपारिक वेशभूषाकरत रॅली काढली. नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली बाजारसमिती आवारात पोहचली. या ठिकाणी रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले. यावेळी आदिवासी कुलदेवता देवमोगर माता,तसेच आदिवासी वीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शहाद्यात तीन जथ्थ्यातून शोभायात्रा
शहादा येथे शोभा यात्रा विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधुन तालुक्यातुन हजारो आदिवासी समाजबांधव एकत्र आले. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातुन भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषा वाद्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते. युवकांच्या हातात एकलव्य यांची प्रतिमा असलेला ध्वज लहरत होता. जंगल जमीन आपुणोसे! जय आदिवासी क्रांतीवीर ख्वाज्या नाइक, बिरसा मुंडा, एकलव्य व अंवरसिंग महाराज याच्या जय घोषणाने शहरातील रस्ते दुमदुमली होते. ही शोभा यात्रा तीन जथ्यातुन निघाली. दोंडाईचा रस्ता बसस्थानक आवारासमोर तहसिल कार्यालय समोर गांधी पुतळा मार्गांने नगर परिषदेला वळसा घेत डोंगरगाव रोड वरील हॉटेल पटेल रेसिडेंसी समोरील अन्नपुर्णा लॉन येथे आली. या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत पहिल्या रस्त्यात अश्वावर बसलेला व्यक्तीने तर क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची वेष परिधान केली होती. ते सर्वासाठी आकर्षण ठरत होते. तर बाकीचे आदिवासी बांधव पायी चालत होते.

आदिवासी मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे – माजी मंत्री माणिकराव गावित
नवापूर । महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शोभा यात्रेला सुरुवात झाली तालुक्यातील गावापाड्यातील आदिवासी बंधु भगिनी शहरातील शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी आमदार सुरुपसिंग नाईक, माजी खासदार माणिकराव गावीत, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, आसका चेअरमन शिरिष नाईक, माजी जि.प. अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्ष रेणुका गावीत,पंस सभापती सविता गावीत, उपसभापती दिलीप गावीत,दिलीप नाईक, गटनेते गिरिश गावीत,अनिल वसावे, आर.सी. गावीत, विनय गावीत, डॉ. अविनाश मावची, भालचंद्र गावीत, डॉ.अर्चना वळवी, रॉबीन नाईक, सुनील वसावे, मनोज वळवी, जालमसिंग गावीत, राया मावची, अरुण गावीत, सरला वसावे आदी उपस्थित होते. नंदुरबार आदिवासीबहुल भागात जागतिक आदिवासी गौरव दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने नवापूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत 20 हजारांहून अधिक आदिवासी बांधव आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले.

महिलांचा लक्षणीय सहभाग
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरूवात करण्यात आली. समारोप दिवंगत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्व.हेमलता वळवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण रॅलीचे सांगता करण्यात आली. यानंतर नवापूर सिनियर कॉलेज येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी आदिवासी समाजाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार सुरूपसिंग नाईक, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित, आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, माजी जिल्हा परिषद भरत गावित, नगराध्यक्षा रेणुका गावित, सभापती सविता गावित, अजीत नाईक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप नाईक, उपसभापती दिलीप गावित, विनय गावित, गिरिष गावित, तानाजी वळवी शासकीय अधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाद्यांच्या निनादाने शहर दुमदुमले
यावेळी आदिवासी तरुणींनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. पारंपरिक शस्त्र कुर्‍हाड, धनुष्यबाण, कोयता, तलवार, बंदूक अश्या अनेक प्रकारचे शस्त्र घेऊन आदिवासी नृत्य सादर करीत होते. सोंगड्या पार्टीचे कलाकार देखील मिरवणूक नृत्य सादर करीत होते. पारंपरिक वाद्य, त्यावर ठेका धरणारे पारंपरिक वेशभूषेतील तरुण हे मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आदिवासी वाद्यांच्या निनादाने शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते.

बोगस आदिवासी वाढल्याने व्यक्त केली खंत
शहरात सर्वात भव्य अशी हि मिरवणूक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत जात असतांना आदिवासी कुलदैवत याहा मोगी माता, वीर बिरसा मुंडा, खाज्या नाईक, जयपाल मुंडा, वीर एकलव्य आदी क्रांतिकारी व आदिवासी दैवतांचा गुणगौरव देखील यावेळी करण्यात आला. या मिरवणुकीत विविध आदिवासी सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी सहभाग नोंदवला होता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नवापूर सिनियर कॉलेज येथे तालुक्यातील 30 हजार लोकांची जेवणाची सोय करण्यात आली होती. आदिवासी हिंदू नाही निसर्गपुजक आहे. कायद्यानुसार हिंदूकोड कायदा आदिवासींना लागू नाही. बोगस आदिवासींचे प्रमाण वाढले आहे. त्यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. आदिवासी मुलांना चांगले शिक्षण घेतले पाहिजे. आपली संस्कृती व रितीरिवाज टिकवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त व्यक्त केले. आभार गिरिष गावीत यांनी मानले

शोभायात्रेने शहर व्यापले
आज आदिवासी दिन असल्याने संपुर्ण आदिवासी तालुक्यातील स्त्री पुरुष,लहान,मुले,युवा वर्ग सहभागी झाले होते गटागटाने घोषणा देत ते शोभायात्रेत सहभागी झाले होते. बँनर,झेंडेने शहर व्यापले होते. शोभायात्राने पुर्ण शहर व्यापुन टाकले होते शहरातील सर्व रस्ते आदिवासी बांधवांनी भरुन गेले होते.

आदिवासी संस्कृतीचे दर्शन
शोभायात्रेत आदिवासी बांधव आपल्या पारंमपारीक वेशभुषेत सहभागी झाले होते. आदिवासी नृत्य करत घोषणा देत परिसर दुमदुमुन गेला होता. एकलव्य, बिरसा मुंडा, खाजा नाईक, तंट्या भील यांची वेशभुषेचा व आदिवासी देवदेवतांचा सजिव देखावा सादर करण्यात आला. यावेळी जिप अध्यक्षा रजनी नाईक व पंस सभापती सविता गावीत यांनी आदिवासी पेहराव करुन शिबली नृत्यात सहभाग घेतला.

आदिवासी दिन कोठार आश्रमशाळेत उत्साहात
तळोदा । श्री. साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपुर संचालित अनंत ज्ञानदीप आश्रम शाळा कोठार येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला पारंपरिक पेहराव करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. आदिवासींची कुलदैवत देवमोगरा मातेचे व विविध क्रांतिकारकांचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वासुदेव पाडवी हे होते. यावेळी आदीवासी समाजाच्या प्रगतीसाठी प्रतिज्ञा सर्व विध्यार्थी व सर्व शिक्षक यांनी घेतली. तसेच आदीवासी राष्ट्रगाण म्हणण्यात आले. विविध क्रीडा स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात आल्या. सूत्रसंचालन जयवंत मराठे यांनी तर आभार भाऊसाहेब कुवर यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक पन्नालाल पावरा, जितेंद्र चौधरी,दीपक मालपुरे, मनोज चिंचोले,योगेश चव्हाण, गोविंद पाटील, शालीग्राम वाणी, जयेश कोळी, पंकज नरसिंगे तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

पारंपारिक वाद्यांसह तालबद्ध शोभायात्रा
यानंतर दुसरा जथ्थात विविध प्राण्यांचे चेहर्‍यांचे मुखवटे लावलेले आदिवासी बांधव दिसत होते. त्यानी रस्त्यावरील लोकांचे लक्ष वेधत होते. सिह, लांडगा, वाघ यासह विविध प्राण्यांचे मुखवटे लहान मुलांचे आकर्षण ठरत होते. तिसरा जथ्था पारंपारिक नृत्याचे कार्यक्रम घेत सरसावत होता. यात आदिवासी बांधव युवक आप आपल्या पारंपारिक पेहराव परिधान करुन नाचत होते. तुतारी, बासरी, पिपारी, ढोल यांच्या गजरात आदिवासी नृत्य करीत होते. तालबध्द लयबध्द शोभा यात्रा ही शहरासाठी अविस्मरणीय ठरली. आदीवासी बांधवानी काढलेल्या शोभायात्रेत वहारु सोनवणे माजी मंत्री डपदमाकर वळवी, राजेंद्र गावीत, मोहन शेवाळे, गोसा पेंटर, पं.स. सभापती दरबारसिंग पवार दामु ठाकरे, नामदेव पटले ,मानक सुर्यवंशी, रविंद्र मुसळदे, रविंद्र ठाकरे, प्रा. अशोक वळवी, प्रा. संजय भामरे, गौतम खर्डे, झेलसिंग पावरा, कालसिंग पावरा यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.

श्री नागेश्वर विद्यालयात मार्गदर्शन
खेड दिगर । दुधखेडा येथील श्री नागेश्वर विद्यालयात आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक चंद्रकांत चिमन जाधव यांनी जसनसेवक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरवात केली. क्रांतीवीर बिरसा मुंडा, टंट्या भील, खाज्या नाईक, गुलाब महाराज यांच्या विषयी माहिती देवून मार्गदर्शन करुन त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यानंतर शिक्षक शिक्षिकांनी देखील मार्गदर्शन करुन त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आदिवासींच्या संघर्षात त्यांचे अनमोल असे जीवन वाहून दिले याविषयी माहिती दिली. यावेळी शिक्षक शिक्षिका, क्लर्क, शिपाई आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन महेंद्र चव्हाण यांनी केले.