The body of 55-year-old Isma was found in Yawal city यावल : शहरातील फैजपूर रस्त्यावरील हॉटेल अंजलीच्या मागे एका 55 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला असून या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय वसंत पारधे (55, सिद्धार्थ नगर, यावल) असे मयताचे नाव आहे.
मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू
संजय पारधे यांचा मृतदेह फैजपूर रस्त्यावरील हॉटेल अंजलीच्या मागील बाजूस आढळला. मयताच्या कपाळावर जखम होती आणि तो चिखलात पडलेला होता. या भागातील नागरीकांनी त्यास तातडीने तेथून यावल ग्रामीण रुणालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिसात गौतम संजय पारधे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.