मुंबई । जगप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजर संदीप कोचर यांनी आजपर्यंत देश-विदेशांमध्ये अनेक रेडिओ आणि टीव्ही शो केले आहेत. विविध वाहिन्यांवर आपले कार्यक्रम सादर केले असून, आजपर्यंत हजारो लोकांना मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या भविष्याबाबत काही बाबी कथन केल्या आहेत.
आता संदीप कोचर हे एका मराठी चित्रपटाद्वारे अभिनयातही आपले पाऊल टाकत आहेत. आगामी मराठी चित्रपट ’भविष्याची ऐशीतैशी- द प्रीडिक्शन’मध्ये अभिनेता म्हणून संदीप प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. संदीप यांनी या अगोदर झी न्यूजवर किस्मत के सितारेद्वारे नऊ वर्षे लोकांना त्यांचे भविष्य सांगितले. त्यानंतर किस्मत कनेक्शन संदीप कोचर के साथ या मालिकेतही सहारा वाहिनीवर एक शो केला, जो खूप प्रसिद्ध ठरला होता. याशिवाय संदीप यांचे शो सध्या दुबईच्या रेडिओ स्पाइस, सिंगापूरच्या रेडिओ मस्ती, लंडनच्या लाईका रेडिओ, सनराइज रेडिओ आणि बीबीसी रेडिओवर नियमितपणे सुरू आहे. याशिवाय एक मोटीव्हेशन स्पीकर म्हणूनही त्यांचे परदेश दौरे नियमित सुरू आहेत. चित्रपट निर्माते रमेश तलवारे निर्मित व सुरेंद्र वर्मा दिग्दर्शित ’भविष्याची ऐशीतैशी- द प्रीडिक्शन’ या चित्रपटाद्वारे संदीप कोचर एका भविष्यवेत्ताच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.