मुंबई । सध्या जगभरात मोबाईलचा वापर वाढत चालला असून भारत एक मोठी बाजारपेठ म्हणून उभी राहत आहे. भारतामध्ये मोबाईल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 2022 पर्यंत जगभरात एकूण 550 कोटी मोबाईल डिव्हाईस असतील. आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा भारताचा असणार आहेत. तोपर्यंत मोबाईल युजर्सच्या बाबतीच भारत पहिल्या क्रमांकावर असेल.
टेलिकॉम रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार भारतात सध्या अंदाजे 100 कोटी मोबाईल फोन युजर्स आहेत. 100 कोटी मोबाईल फोन युजर्सपैकी 30 टक्के म्हणजेच 30 कोटी युजर्सजवळ स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन युजर्सपैकी 94 टक्के लोक अॅड्रॉईड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात.