जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ट्रम्प यांच्या हस्ते उद्घाटन !

0

अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवशीय भारत दौऱ्यावर आहेत. अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प पत्नी आणि मुलीसह भारतात दाखल झाले आहे. त्यानंतर अहमदाबाद विमानतळावरून ट्रम्प यांचा ताफा साबरमतीला पोहोचला. त्याठिकाणी ट्रम्प यांनी सपत्नीक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरख्यावर सुतकताई केली. साबरमतीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमच्या उद्घाटनाला पोहोचले आहे. १ लाख १० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमचे ट्रम्प उद्घाटन करणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टेडियम भरलेला आहे.