जनतेचे आवाज दाबणाऱ्यांना जनता धडा शिकवेल-अमित शहा

0

कोलकाता। पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या रथयात्रेला परवानगी देण्यात आलेली नसल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाना साधला आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे मात्र गावागावांत माझे आवाज पोहोचेल अशी टीका अमित शहा यांनी ममता बनर्जी यांच्यावर केली आहे.

भाजपला रोखण्यासाठी ममता बनर्जी यांनी अथक परिश्रम करावे मात्र ते यात यशस्वी होणार नाही. आणीबाणीचा संदर्भ देत त्यांनी जनतेचा आवाज दाबणाऱ्यांना जनता धडा शिकविते असेही त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये देखील तेच होणार आहे असा दावा अमित शहा यांनी केला आहे.