जनतेच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी माझ्या विरोधात कारवाई-रॉबर्ट वड्रा

0

नवी दिल्ली-जमीन खरेदीतील कथित अनियमततेविरोधात काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना रॉबर्ट वड्रा यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. रॉबर्ट वड्रा यांच्यासह हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधातही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

इंधनाच्या किंमती दिवसेंदिवस वाढतायेत…त्यामुळे मुख्य मुद्दयांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी एक दशकापूर्वीचा मुद्दा उकरुन काढण्यात आला आहे, यामध्ये नवीन असे काय आहे? असं वड्रा म्हणाले. तर स्वतःचं राजकीय अपयश झाकण्यासाठी अशाप्रकारच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जात आहे, अशी प्रतिक्रिया भुपिंदरसिंह हुडा यांनी दिली आहे.