शहादा : शहरातील जनतेने विश्वासाने निवडून दिल्याने त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शहाराच्या विकासासाठी सोबत रहावे. विरोधकांनी तशीच भूमिका ठेवली तर जनता तुम्हाला माफ करणार नाही ,असे आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी मतदारांना जाहीर आभार सभेतून केले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल मार्गावर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व नगरसेवक हे विजयी झाले. मतदारांनी दिलेला कौल व त्यांचे जाहिर आभार सभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी खा.डॉ.हिना गावित, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया उपस्थित होते.
कामासाठी कधीच विरोध नाही
आ.डॉ.गावित यांनी म्हटले की, नंदुरबार पालिकेत आमची सत्ता असतांना शहर विकासासाठी निधी दिला. कामासाठी कधीच विरोध केला नाही. सत्ता नसली तरी विकासाची कामे करून कार्यकर्ता उभे करण्याचे काम आम्ही करतो. जे काहीच करत नाही, करू शकत नाही त्यांना विकास कसा करावा या पेक्षा विकासासाठी मतदार यांच्याकडून समजून घ्यावे. शहादा शहराच्या विकासासाठी मतदारांनी दिलेला कौल मान्य करावा. विरोधकांनी फक्त विरोधी भूमिका बजवू नये, असे केल्यास जनता तुम्हाला माफ करणार नाही. विरोधकांनी सत्ताधार्यांचा सहकार्याने शहराचा विकास करावा, असे डॉ.गावीत यांनी म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विष्णू जोंधळे यांनी मानले.