जनतेने संधी दिल्यास विकासावर अधिक भर देणार

0

चोपडा । सर्वसाधारण जागेसाठी मला शिवसेनापदाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी उमेदवारी देवून माझ्यावर जो विश्वास ठेवून घोडगाव-लासूर गटातील घोडगाव, मालखेडा, वाळकी, शेंदणी, पिटमेर, वढोदा, अजंतीसिम, मोहिदा, दगडी, अनवर्दे, कुसूंबा, वेळोदा, लासूर, गणपूर, शिकापल, अवाळे, गडंगी, धानोरा प्र. या गावांची सेवा करण्याची संधी देवून तनमनधनाने जनतेची सेवा करण्यास तत्पर राहिल.
गटातील घोडगाव येथील सुपूत्र असून घोडगाव ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून अवघ्या 18 महिन्याचा कालावधीत विविध विकास बघता नवीन ओळख देण्याची गरज भासत नाही. तरी या कृषीप्रधान कष्ठकरी शेतकरी कुटुंबातील उमदा शेतकरी शेती सोबत व्यापारात गावातील सामाजिक सेवेत माझा ठसा उमटवीत असतांना योगायोगाने मला उमेदवारी घोषित करण्यात आली. सोबतच समाजसेवा आपला आशिर्वाद व असंख्य जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढवित आहे. अशी माहिती हरीष पाटील यांनी सांगितली.

गरजू रुग्णांना योजनेचे लाभ मिळवून देणार
ग्रामीण भागाच्या खरा हा जिल्हा परिषदेकडे मिनी मंत्रालय म्हणून बघितले जाते. जिल्हा परिषदेच्या निधीच्या माध्यमातून शेती शिवारात शेत रस्ते, गटातील गावामध्ये जाणारे रस्ते, जि.प.च्या शाळांच्या झालेल्या दुरावस्था व शौचालय, शिक्षक कमी असल्यास त्यांची रिक्त जागा भरणे, गरजू रुग्णांना योजनेचे लाभ मिळवून देणार तसेच सर्वप्रथम महिलांसाठी शौचालय बांधून महिलांना खरा न्याय मिळवून देणार. जि.प.च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या अडीअडचणी सोडविणार व शेतकर्‍यांना शेती उपयोगी अवजारांचा विविध योजना मिळवून देणार, आदिवासी समाजासाठी समाज कल्याण योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहचविणार, गावागावांमध्ये काँक्रिटीकरण करणार असल्याचेही सांगितले.