जळगाव- संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या व आगामी महापौर पदाच्या दावेदारीचा प्रभाग असलल्या 7 मध्ये शहराचे विद्यमान आमदार राजुमामा भोळे यांनी त्यांच्या पत्नीसह इतर तिनही उमेदवारांना जिंकून आणून गड कायम राखला. विशेष म्हणजे या प्रभागातून विद्यमान भाजप नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी बंडखोरी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यांना सेनेने पुरस्कृत केल्याने या बाबत उत्सुकता होती. सीमा भोळे या आगामी महापौरपदाच्या दावेर आहेत तसेच विद्यमान नगरसेवक दीपमाला काळे व अश्विन सोनवणे यांचा पुर्वाश्रमीचाच प्रभाग असल्याने त्यांना ही निवडणूक सोपी गेली.