जनशक्तिच्या ‘सरकार’ अभीष्टचिंतन विशेषांकाचे प्रकाशन

0

पिंपरी-चिंचवड / पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘जनशक्ति’ने रविवारी ‘सरकार’ अभीष्टचिंतन हा विशेषांक प्रकाशित केला. या विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे सरचिटणीस महेंद्र सिंग, भोसरीचे आमदार महेश लांडगे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हा कार्यक्रम भोसरीतील रोशन गार्डनमध्ये थाटात पार पडला. याप्रसंगी महापौर नितीन लांडगे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अ‍ॅड. नितीन लांडगे, रवी लांडगे, विलास मडिगेरी, ‘जनशक्ति’चे सरव्यवस्थापक हनुमंत बनकर, विशेष राजकीय प्रतिनिधी बापू जगदाळे यांची उपस्थिती होती. तसेच पुणे येथे ‘जनशक्ति’च्या ‘सरकार’ या विशेषांकाचे प्रकाशन खा. अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.