जळगाव- ‘दैनिक जनशक्ति’चे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बदलीबाबत सर्वप्रथम भाकित वर्तवून दि. 23 रोजी अंकात ‘निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी‘ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. शिंदे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले बदलून येणार आहे.
राज्यातील 10 आयपीयएस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी सकाळी गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी पारित केले. त्यानुसार जळगावचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पी.व्ही.उगले यांची नियुक्ती झाली आहे. तर जळगावचे दत्ता शिंदे यांची मुंबई येथील सुरक्षा व अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
अधीक्षकांच्या नावाबाबतही भाकित तंतोतंत खरे
अधीक्षक शिंदे यांच्या बदलीनंतर नंतर त्याच्या जागी येणार्या जोरदार चर्चा असलेल्या नावांबाबतही ‘जनशक्ति’ने भाकित वर्तविले होते. यात दि.25 रोजी अंकात ‘डॉ. पंजाबराव उगले जळगावचे नवीन एस.पी ‘ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. जनशक्तिचे अधीक्षकाच्या नावाबाबतचे भाकितही तंतोतंत खरे ठरले असून डॉ. पंजाबराव उगले यांचीच जळगावला वर्णी लागली आहे.