जळगाव : सन 2018 मध्ये अब्दुल सत्तार यांची चार प्रकरणात सीआयडी चौकशी झाली होती आणि ते प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या टेबलवर कारवाईसाठी प्रस्तावित होते. या प्रकरणात कारवाई करू नये म्हणून अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाण्यास तयार झाले परंतु स्थानिक विरोधानंतर देवेंद्र फडणीस यांनी अब्दुल सत्तार यांना शिवसेनेत पाठवले. शिवसेनेमध्ये अब्दुल सत्तार फडणवीस यांच्या इशार्यानुसारच काम करत होते त्यामुळेच भाजपाच्या कारस्थान नुसार आज त्यांनी शिवसेना पक्ष उद्ध्वस्त करून टाकला, असा दावा महेश शंकरलाल शंकरपेल्ली (सिल्लोड) यांनी केला आहे.