बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहिती
अंबाजोगाई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी शासनाच्या विरोधात महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे.ही जनसंघर्ष यात्रा गुरूवार,दि.1 नोव्हेंबर 2018 रोजी अंबाजोगाईत येणार असून यावेळी शहरातील वंजारी वसतीगृहाच्या मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जनसंघर्षयात्रा व जाहीर सभेच्या पूर्वतयारीसाठी अंबाजोगाईत बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीचे शुक्रवार,दि.26 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथे गुरुवार,दि.1 नोव्हेंबर रोजी वंजारी वसतीगृहाच्या मैदानात जनसंघर्ष यात्रेचे जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या सहित काँग्रेस पक्षाच्या राज्य पातळीवरील मोठ्या नेत्यांचे मार्गदर्शन होणार आहे. राज्यातील जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या जनविरोधी धोरणांबाबत जनजागृती करुन भाजपा शिवसेना सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचा हा तिसरा टप्पा आहे. या सभेची जय्यत तयारी सध्या अंबाजोगाईत सुरु आहे. सभेच्या पूर्व तयारीसाठीची बैठक शुक्रवार,दि.26 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मिटिंग हॉल येथे होणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, विविध सेलचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.