भुसावळ । स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भुसावळ शहराचा अस्वच्छतेच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागल्यामुळे जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांच्या प्रतिमेला चपला-बुटांचा हार घालून निषेध केला. या प्रकरणी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने शहर पोलीस स्थानकात जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी 24 रोजी जमावबंदीचे आदेश दिले असतांना जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी निषेध केला. त्यामुळे जनाधार पार्टीचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, माजी नगरसेवक जगन देवराम सोनवणे, नितीन धांडे, दुर्गेश ठाकूर, राहुल बोरसे, गणेश पाटील, राहुल सोनवणे, आशिक खान शेरखान, श्याम भोसले, विशाल टोके, सचिन पाटील, नीना (पूर्ण नाव माहित नाही) व अन्य 10 ते 12 कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.