जनार्दन म्हात्रे प्रतिष्ठानमार्फत शिक्षकांचा गौरव!

0

विरार । स्वर्गीय जनार्दन म्हात्रे प्रतिष्ठान आयोजित जिल्हा परिषद शाळेच्या कामण व मालजीपाडा केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव पालघर मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड चिंतामण वनगा यांच्या हस्ते करण्यात आला. ज्ञानोद्य मल्टिपर्पज हायस्कूल कोल्ही चिंचोटी येथे 6 सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे विधानसभा मतदार संघाचे संजय केळकर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे यांनी प्रतिष्ठान राबवत असलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तसेच पुढे प्रास्तवित असलेल्या कामांची यादी सादर केली. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात खासदार वनगा यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम येथील शिक्षक चांगल्या प्रकारे करत असल्याचे सांगितले.

भावी समाज घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
प्रमुख पाहुणे केळकर यांनी शिक्षक हा भावी समाज घडवण्याची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. कामण केंद्रातील हारुण तामीज शेख, उर्दू शाळा, आल्विना विवियन मिस्कीटा मराठी शाळा, गोपीनाथ नरेश सोगले सारजामोरी शाळा तर मालजीपाडा केंद्रातील संगीता राहुल नाडकर्णी जूचंद्र शाळा, सीमा मोझेस डिमेलो बोबडपाडा शाळा, सुजाता जगन्नाथ मेहेर चंद्रपाडा शाळा आदी शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.