Extension of Rewa-Mumbai, Jabalpur-Coimbatore trains भुसावळ : आगामी सणांमुळे रेल्वे प्रशासनाकडून रीवा-मुंबई व जबलपूर कोईबंतूर या गाड्यांच्या धावण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
प्रवाशांना मिळाला दिलासा
रीवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रीवा साप्ताहिक स्पेशल गाडी चालविण्याचा कालावधी हा 27 ऑक्टोबर 22 पर्यत होता. यात रेल्वे प्रशासनाने वाढ केली आहे. हा कालावधी आता 29 डिसेंबरपर्यत पर्यत वाढविण्यात आला. 02187 ही गाडी प्रत्येक गुरूवारी रीवा स्थानकावरून सुटल्यानंतर गाडी 02188 ही गाडी दर शुक्रवारी सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टमिनस)येथून सुटेल. ही गाडी मुंबई येथून 30 डिसेंबरपर्यत वाढविण्यात आली.
जबलपूर-कोईंबतूर विशेष गाडीच्या फेर्या वाढवल्या
जबलपूर-कोईंबतूर या विशेष गाडीच्या फेर्यांमध्ये वाढ करण्यात आली. 02198 ही साप्ताहिक गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून सुटेल. या गाडीच्या कालावधी सुध्दा 30 डिसेंबरपर्यत वाढविण्यात आला आहे तसेच 02197 ही गाडी दर सोमवारी कोईंबतूर येथून सुटेल. या गाडीचा कालावधी 2 जानेवारी 2023 पर्यत वाढवण्यात आला आहे.