कराची । पाकिस्तानचा निलंबित कसोटी फलंदाज नासिर जमशेद याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली आहे. पीसीबी आपल्याला स्पॉट फिक्सिंगमध्ये गोवण्यासाठी साक्षीदार म्हणून सहकारी खेळाडूंवर दडपण आणत असल्याचा त्याचा आरोप आहे.
पाककडून दोन कसोटी, 48 वन डे आणि 18 टी-20 सामने खेळलेल्या जमशेदने आपण ब्रिटनमध्ये असताना इकडे मायदेशात पीसीबीने सहकारी खेळाडूंवर खोटी साक्ष देण्यासाठी दडपण आणल्याचा आरोप केला. ’पीसीबी माझ्यासोबत सूडभावनेने वागत आहे. अधिकारी माझ्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी सहकारी खेळाडूंवर दडपण आणत आहेत. माझी बदनामी व्हावी, असे पीसीबीला वाटते.’, असे जमशेद म्हणाला.