जमावाच्या मारहाणीत तरूण जखमी

0

नंदुरबार । शहरातील शास्त्री मार्केट भागात पेट्रोल चा भडका होऊन एक जण भाजला. तर संतप्त झालेल्या जमावाने एका तरुणाला जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, शास्त्री मार्केट भागात शब्बीर पिंजारी यांची चिकन टिक्का ची लॉरी आहे. या लॉरिवर रविवारी रात्री सचिन मराठे हा तरुण आला होता. त्याने शब्बीर पिंजारी यांच्याकडे चिकन बिर्याणीची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

परिसरात पोलिस बंदोबस्त
सचिन मराठे याने पेट्रोलची बाटली भट्टीत ओतल्याने आगीचा भडका उडाला. त्यात शब्बीर पिंजारी हे भाजले गेले. हा प्रकार पाहून त्या ठिकाणी 20 ते 25 जणांचा जमाव आला होता. या जमावाने सचिन मराठे या तरुणाला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी दवाखाण्यात उपचार सुरू आहेत. काही लोकांनी हस्तक्षेप केल्यामुळे शहरात होणारा मोठा वाद टळला आहे, या बाबत पिंजारी यांनी पोलीस ठाण्यात फीर्याद दिली असून सचिन मराठे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन हा बेशुध्द असल्याने त्याचे जबाब झाले नाहीत. या घटनेमुळे तणाव पसरला असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.