जमियत उलमा-ए-हिंदतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

0

नंदुरबार। कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडॉऊन असल्याने गरजू, रोजंदारी कामगार, हातावर पोट भरणार्‍यांचे हाल होत आहेत. याचे सामाजिक भान ठेवून येथील जमियत उलमा-ए-हिंदतर्फे शहरातील मोहल्ला कमिटीमार्फत सर्वे करुन शहरातील सुमारे ५५० गरजूंना रेशन तसेच जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. 

यावेळी जमियत उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना जकरिया रहेमानी, सचिव हाजी मेमन, सदस्य  सय्यद इसरार अली, सलीम लोहार, सैय्यद नासिर अली, कादिर मिया अली, सादिक शेख, जमाल खाटीक, वसीम खान, वाहिद मन्यार, सज्जाद सैय्यद, जुबेर मन्यार, छोटेहाजी मेमण तसेच मोहल्ला कमिटीचे सदस्य व  पदाधिकार्‍यांचे योगदान लाभत आहे.