जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांकडून भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

0

श्रीनगर-जम्मू- काश्मीरमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. शाबीर अहमद भट असे या हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शाबीर यांच्या हत्येचा निषेध केला आहे.

शोपियाँन जिल्ह्यातील बोंगम येथे राहणाऱ्या शाबीर अहमद भट यांचे मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात शोधमोहीमही सुरु केली. बुधवारी पहाटे त्यांचा मृतदेह किल्लूरमध्ये सापडला. ३० वर्षीय शाबिर अहमद हे भाजपामध्ये सक्रीय होते. भाजपाच्या युवा मोर्चाचे ते पदाधिकारीही होते.

गेल्या आठवड्यात जम्मू- काश्मीरमध्ये महापालिका आणि पंचायत निवडणूक घेण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर दहशतवाद्यांनी ही हत्या केली आहे.