जम्मू-काश्मिरात बस अपघातात ८ जण ठार

0

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात आज शुक्रवारी बस नदीत पडून झालेल्या अपघातात ८ जण ठार झाले, तर अनेक जण बेपत्ता आहेत.

ही मिनी बस जिल्ह्यातील ठक्री गावातून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस चिनाब नदीत कोसळली. या बसमधून २५ प्रवासी प्रवास करत होते. बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ८ मृतदेह सापडले आहेत. बाकी प्रवासी वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.