जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये बस दरीत कोसळली ; 11 जणांचा मृत्यू

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये शनिवारी 8 डिसेंबर रोजी बस दरीत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात्तात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी लूरन येथून बस पूंछ येथे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.