श्रीनगर-जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्याने राज्य सरकार कोसळले असून राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल एन.एन.वोहरा यांनी बुधवारी राज्याची सुत्रे हाती घेतली आहेत. यासोबतच काश्मीरमध्ये प्रशासकीय हालचालीदेखील सुरु झाल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निकटवर्तीय समजले जाणारे छत्तीसगडचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) बीव्हीआर सुब्रमण्यम यांना काश्मीरमध्ये आणण्यात आले आहे.
सुरक्षा दलांनी दहशतवादाविरोधातील कारवाईचा वेग वाढवला आहे. बुधवारी डीजीपी एसपी वैद यांनी आता दबावातून मुक्त झाल्याचा संकेत देत आता दहशतवादाविरोधातील कारवाईला वेग आणणार असल्याचे सांगितले आहे. राज्यपाल राजवटीत काम करणे पोलिसांना सोपे जाईल असे एसपी वैद यांनी सांगितले आहे.