जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम

0

जळगाव । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त महानगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे महानगर उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे. सकाळी 9.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रेल्वेस्टेशन जवळील पुर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात येईल. व 11 वाजता अभिवादन सभा होईल.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम दुपारी 12.30वाजता शहरातील कानळदा रोड येथील महादेव नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तसेच औद्योगिक वसाहत येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. सायंकाळी 7.15 मि. भिमशाहीर आधारजी रसाणे व गायिका यांचा भिमगीत गायनाचा समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन स्थळ जयप्रकाश नारायण चौक, नटवर टॉकीजजवळ केलेले आहे. तसेच उत्कृष्ठ लेझीम पथक, आरास देखावे, मंडळाचे पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ व प्रत्येक मिरवणुकीला सन्मान चिन्ह (ट्रॉफी) वाटप मा. जिल्हाधिकारी, आमदार राजुमामा भोळे, जिल्हा पोलिस अधिक्षक, महापौर, आयुक्त तसेच आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते डी.आर.निकम, बी.के. बनसोडे, सुरेश अडकमोल इ. मान्यवराचे हस्ते पारितोषिक वाटप होणार असून भिमसैनिकांनी मिरवणूकी दरम्यान कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेवून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महानगर उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केले आहे.